
बद्दल
स्थान: मुंबई -बीड महामार्गावर नगर पासून ३६ मैलावर.
विशेष: सर्वांग सुंदर ३॥ फूट उंचीची, शिव मध्ये असलेली दत्त मूर्ती.
मुंबई-बीड राजमार्गावर नगरपासून ३६ मैलांवर आष्टी हे बीड जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे.
माघ वद्य प्रतिपदा शके १८८८ शनिवार दि. २५/२/१९६७ रोजी येथे श्रीदत्तमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही मूर्ती जयपूरहून मुद्दाम तयार करवून आणली आहे. ती शिवदत्ताची म्हणजे त्रिमुखांपैकी मधले मुख शंकराचे असलेली आहे. मूर्ती ३॥ फूट उंच, शुभ्र संगमरवरी पाषाणाची असून, ध्यान अत्यंत नयनमनोहर व विलोभनीय असे आहे.
या मंदिराची पूजा-अर्चादी सर्व व्यवस्था श्रीदत्त अवधूत परंपरेतील प. पु. श्री. रघुनाथ महाराज कालकुंद्रीकर यांच्या पत्नी प. पु. श्रीमती शामला रघुनाथराव कालकुंद्रीकर ( विश्वस्त ) यांच्या देखरेखेखाली सदगुरु सेवेकरी मंडळ व शिष्यगण यांच्या मार्फत कार्यरत आहे.


